आई माझा गुरु : आईसह गुरुलाही वंदन

 

सावंतवाडीत अंगणवाडीच्या मुलांनी साजरी केली गुरुपौर्णिमा

सावंतवाडी । प्रतिनिधी : आई माझा गुरु आई माझा कल्पतरू अशी प्रार्थना लहानपणी शाळांमध्ये घेतली जाते. आपल्याला ज्ञान देणाऱ्या गुरुंबरोबरच जन्मदात्या आईला प्रथम गुरु मानलं जातं. याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील जिल्हा परिषद शाळा नंबर दोन मधील अंगणवाडी क्रमांक ६६ च्या छोट्या बालकांनी गुरुपौर्णिमा उत्सव निमित्त आपल्या आईला वंदन करीत गुरुंचेही आशीर्वाद घेतले.

यावेळी अंगणवाडी सेविका अनुराधा पवार आणि मदतीस अमिषा सासोलकर यांना आणि आपल्या आईला छोट्या बालकांनी ओवाळणी करून औक्षण केले. सुरुवातीला प्रथम गुरु असलेल्या आईचे पाय धूऊन त्यांना दंडवत करण्यात आले. त्यानंतर गुरू म्हणजेच शिक्षकांना वंदन करण्यात आले. यावेळी श्लोक म्हणण्यात आले तसेच गुरुवंदना ही करण्यात आली.

यावेळी अंगणवाडीतील तीन वर्षाच्या छोट्या बालकांमध्ये चिराग विरनोडकर, सावी नेवगी, गंधार नाईक, चिन्मय नाईक, समर्थ काष्टे, स्निग्धा प्रभू, विशाखा साटेलकर, तनया शिरसाट, रिधिमा किटलेकर, अत्रय टोपले, गुरुराज केसरकर, सुखम करमळकर, शुभ्रा गावडे यांच्यासह मातापालक सौ. सपना वीरनोडकर, स्वानंदी नेवगी, पल्लवी टोपले, भावना किटलेकर, भक्ती नाईक, रुची नाईक, नेहा काष्टे आदी सहभागी झाल्या होत्या.

फोटो – सावंतवाडी माठेवाडा येथील अंगणवाडीच्या छोट्या बालकां कडून गुरुपौर्णिमा साजरी करताना

छाया (जतिन भिसे )