प्रेमजीभाई आसर प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमा साजरी

चिपळूण– परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालय, चिपळूण या शाळेत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
आजच्या कार्यक्रमांमध्ये प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. संगीता नाईक मॅडम यांच्या हस्ते परशुराम प्रतिमेचे पूजन आणि ग्रंथ पूजन करण्यात आले.याप्रसंगी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. गगनग्रास मॅडम यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेविषयी माहिती दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. संगीता नाईक मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनातील गुरुचे महत्व सांगून गुरु शिष्यावर आधारित कथेचे आपल्या ओघवत्या शैलीत कथन केले.
शाळेमध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी बालसभेचे आयोजन करण्यात येते.बालसभा हे एक या शाळेचे वैशिष्ट्य आहे. हा संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थीच संयोजित करतात. सूत्रसंचालन,अध्यक्ष निवड, विद्यार्थ्यांची भाषणे,अध्यक्षीय भाषण आणि समारोप ही सर्व कामे विद्यार्थीच अतिशय उत्साहाने पार पाडतात.इयत्ता तिसरी व चौथीच्या वर्गांमध्ये या बालसभेचे आयोजन करण्यात आले होते.इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गांमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुशिष्यांच्या कथांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.
अशाप्रकारे शाळेमध्ये अतिशय उत्साहामध्ये गुरुपौर्णिमा एक अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली.