कोंडगाव जोयशीवाडी येथील प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

crime

 

साखरपा | वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव जोयशीवाडी येथील देवेंद्र काशीराम जोयशी वय सुमारे ५३ याने राहत्या घरी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास घरात नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली, यावेळी घरातील सर्व माणसे झोपलेली असताना हा प्रकार घडला.

यावेळी पोलीस पाटील यांना खबर मिळताच जोयशीवाडी येथे जाऊन घटनेची खात्री केली आणि तेथील सुरेश जोयशी यांना घेऊन साखरपा पोलीस दूर क्षेत्रात खबर दिली.

यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव पोलीस नाईक वैभव कांबळे कोंडगाव पोलीस पाटील मारुती शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन कार्यवाही सुरू केली, मात्र आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

त्यांना तीन मुलगे दोन मुली पत्नी आई वडील असा मोठा परिवार आहे.