माडावर चढून शहाळे काढताना हाय होल्टेज तारेचा शॉक लागून माजी सैनिकाचा दुर्दैवी मृत्यू ; ओरोस येथील घटना 

सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी

आपला मुलगा आजारी असल्याने त्याला शहाळ्याचे पाणी देण्यासाठी आपल्या घराजवळील माडावर चढून नारळ काढताना, त्याच्या बाजूने गेलेल्या हाय होल्टेज इलेक्ट्रिकल तारेचा शॉक लागून जमिनीवर कोसळल्याने ख्रिश्चनवाडी येथील फिलिप्स फ्रान्सिस परेरा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
ओरोस येथे झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे ओरोस परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.फिलिप्स फ्रान्सिस परेरा यांच्या मुलाला डेंग्यू झाला असून, तो येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याला शहाळ्याचे पाणी आवश्यक असल्याने परेरा हे आपल्या घराशेजारी असलेल्या माडाच्या झाडावर शहाळ काढण्यासाठी चढले होते. मात्र यावेळी काळ आपली त्या ठिकाणी वाट पाहत आहे याची कोणतेही कल्पना त्यांना नव्हती.

ते नारळाच्या झाडावर चढून नारळ काढत असतानच या झाडाच्या शेजारून जाणारी हायव्होल्टेज इलेक्ट्रिक तार याचा स्पर्श चुडतांना झाला. सध्या पावसाचे दिवस असल्याने त्याचा शॉक पास्कल यांना लागला या शॉपमुळे परेरा हे माडावरून खाली जमिनीवर कोसळले.यात ते पूर्णपणे जखमी झाले होते. तात्काळ त्यांना येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. जिल्हा रुग्णालयात जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते मृत असल्याचे घोषित केलं. यामुळे लोगो कुटुंबीयांबरोबरच पूर्ण ओरोस ख्रिश्चनवाडी आणि परिसरावर दुःखाची छाया कोसळली आहे.परेरा यांच्या पश्चात त्यांची पत्नी, आजारी असलेला मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. परेरा हे सैन्यांमध्ये सेवेत होते. सैन्याच्या सेवेमधून निवृत्त झाल्यानंतर ते जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य सेवक म्हणून कार्यरत होते, ते अलीकडेच सेवानिवृत्त झाले होते.

याबाबतची खबर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याला मिळाली असता, सहाय्यक पोलीस निरीक्षक एम एम कोल्लटकर यांच्यासह सहाय्यक पोलीस फौजदार नंदकुमार गोसावी, पोलीस नाईक रुपेश नाईक तसेच महिला पोलीस नाईक स्नेहल राणे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. पास्कल यांच्यावर शवविच्छेदन करून त्यांची बॉडी सायंकाळी नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आली आहे.