हडपीड स्वामी समर्थ मठ येथे वटवृक्ष देवस्थान श्री दत्त देवालयाचे उदघाटन

मसुरे | झुंजार पेडणेकर:
स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालित देवगड तालुक्यातील  श्री स्वामी समर्थ मठ हडपीड येथे   श्री दत्त जयंती उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.यावेळी मठाच्या प्रवेशद्वारा नजीक नव्याने उभारण्यात आलेल्या वटवृक्ष देवस्थान श्री दत्त देवालयाचे उदघाटन डॉक्टर केशव श्रीराम पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष प्रभाकर राणे, संस्थापक सचिव श्री.नंदकुमार तुकाराम पेडणेकर, श्री भांई आईर, श्री नितीन म्हापसेकर, खजिनदार श्री ज्ञानेश्वर राऊत, श्री.सत्यवान राऊत, श्री मधुकर भडसाळे श्री मारुती जंगम पुजारी आदी सह स्वामीभक्त उपस्थित होते. दत्त जयंती निमित्त श्री गणेश पूजा, पादुका पूजन, पुण्यवाचन, होमहवन, लघुरुद्र, पालखी सोहळा,
महाआरती, तीर्थ प्रसाद, दुपारी नामस्मरण आणि भक्तीमय कार्यक्रम,सायं डबलबारी भजनाचा  जंगी सामना कोटेश्वर प्रासादिक भजन मंडळ,बुवा सुजित परब विरुद्ध श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ बुवा श्री. रामचंद्र (बाबा) चोपडेकर यांच्यात झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी व गाव समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.