नॅशनल अबॅकस स्पर्धेत कणकवलीतील विद्यार्थ्यांचे यश

कणकवली : प्रोएॅक्टिव्ह अबॅकस यांच्यावतीने घेण्यात आलेल्या समर स्पर्धेत कणकवलीतील (जि.सिंधुदुर्ग) एन्टिटी प्रोएॅक्टिव्ह अबॅकस सेंटरच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. स्पर्धेत एकूण ७९०० विद्यार्थ्यांमध्ये एन्टिटी प्रोएॅक्टिव्ह अबॅकस सेंटरच्या यश दिपक गोसावी याने प्रथम, सौम्या समीर ठाकूर हिने द्वितीय, नारायण रमेश रणशूर याने पाचवा क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले. तसेच स्वर सत्यम कांचवडे, खुशी संतोष तावडे, ग्रंथिक हेमंत काळसेकर, जान्हवी विनोद मर्ये, दर्श गणेश परब, भूषण संतोष तावडे, आभा जीवन हजारे, जयेश सचिन पाटील या विद्यार्थ्यांनीही आपले कौशल्य पणाला लावत यश संपादन केले.यांना एन्टिटी प्रोएॅक्टिव्ह अबॅकस सेंटरच्या संचालिका पूजा राणे मॅडम व पालकांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सर्व मुलांचे सर्वत्र कौतुक होत आहे.