वैभववाडी पोलीस निरीक्षकपदी फुलचंद मेंगडे यांची नियुक्ती

वैभववाडी : नरेंद्र कोलते : वैभववाडी पोलीस निरीक्षक पदी फुलचंद मेंगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
यापूर्वी वैभववाडी पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून सागर खंडागळे कार्यरत होते. त्यांची बदली सावंतवाडी पोलीस ठाणे येथे झाली आहे.
जिल्ह्यातील देवगड, कुडाळ व सावंतवाडी येथील पोलीस ठाण्यात श्री. मेंगडे यांनी पोलीस निरीक्षक पदावर काम केले आहे. त्यांची बदली सावंतवाडीहून वैभववाडी पोलीस ठाणे या ठिकाणी झाली आहे. वैभववाडी पोलीस ठाणे हद्दीत सर्वांच्या सहकार्याने कायदा व सुव्यवस्था राखली जाईल. असे त्यांनी सांगितले आहे.