कबुलायतदार गांवकर प्रश्न मार्गी लागल्याने विकास कामांना तसेच पर्यटन वाढीला मिळणार चालना : राजन तेली

स्थानिकांसह आंबोली माऊली मंदिरात पेढे ठेवून केला आनंद साजरा

सावंतवाडी । प्रतिनिधी : आंबोली गेळे कबुलायतदार गांवकर प्रश्न मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत मार्गी लागल्यानंतर सायंकाळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आंबोलीत भेट देत तेथील ग्रामस्थांसह आंबोली येथील श्रीदेवी माऊलीला पेढे ठेवून स्थानिक ग्रामस्थांसह आनंद साजरा केला. यावेळी राजन तेली यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागला असून ग्रामस्थांच्यावतीने आपण या सर्वांचे आभार व्यक्त करतो. हा प्रश्न मार्गी लागल्याने भविष्यात येथील विकासकामांना तसेच पर्यटन वाढीला चालना मिळणार असून शेतकऱ्यांना आता विकासात्मक निर्णय घेताना कुठलीच अडचण येणार नाही, असे यावेळी राजन तेली यांनी स्पष्ट केले.

यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजपचे आंबोली मंडल अध्यक्ष रवि मडगावकर, कबूलायतदार गांवकर संघर्ष समितीचे अध्यक्ष शशिकांत गावडे, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक मनोज नाईक, आंबोली सरपंच सावत्री पालेकर, माजी जि.प. सभापती आत्माराम पालेकर, ज्ञानेश्वर राऊत, नमीता राऊत, ग्रा.प. सदस्य संतोष पालेकर, बाळा सावंत, रामा गावडे, तानाजी गावडे ,राजन गावडे,शंकर चव्हाण, विलास गावडे, नारायण चव्हाण, विष्णू चव्हाण रमेश गावडे, शंकर गावडे, मनोहर गावडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष शशिकांत गावडे यांनी राजन तेली यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले. यावेळी स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.