नाभिक समाज मालवण युवा तालुकाध्यक्षपदी संदीप लाड यांची नियुक्ती

 

मालवण | प्रतिनिधी : नाभिक समाज मालवण युवा तालुकाध्यक्ष पदी कोळंब येथील संदीप लाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य संघटक विजय चव्हाण, प्रांत सरचिटणीस राजन पवार यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
संतसेना नगर श्री देवी भैरवी मंदिरामध्ये आयोजित कार्यक्रमात संदीप लाड यांना जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण, जिल्हा युवा अध्यक्ष रुपेश पिंगुळकर यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी राज्य संघटक विजय चव्हाण, जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण, महिलाध्यक्ष प्रतिभा चव्हाण, जिल्हा युवा अध्यक्ष रुपेश पिंगुळकर, जिल्हा सचिव जगदीश चव्हाण, तालुकाध्यक्ष भाऊ चव्हाण, उपाध्यक्ष संदीप चव्हाण, प्रज्ञा चव्हाण, विजय चव्हाण, आनंद आचरेकर, कांता चव्हाण, विशाखा चव्हाण, जगदीश वालावलकर, निलेश चव्हाण, दीपक चव्हाण, रामकृष्ण चव्हाण, राजेश चव्हाण, यशवंत लाड, ओंकार आचरेकर, उमेश चव्हाण, सूर्यकांत चव्हाण आदी उपस्थित होते.