यवतमाळ : समृद्धी महामार्गावर ‘विदर्भ ट्रॅव्हल्स’च्या ज्या बसने २५ जणांचा बळी घेतला, ती बस यवतमाळ जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या नावे आहे. पूर्वी वाहतूक शाखेत कार्यरत या पोलीस अधिकाऱ्याने पत्नीच्या नावे बस खरेदी करून प्रवाशी वाहतुकीचा व्यवसाय सुरू केला होता, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, २५ प्रवाशांचे बळी घेणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघाताचा तपास खामगाव चे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. घटनेचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचा दावा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली. दुसरीकडे जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी मार्गावर होणाऱ्या अपघाताना प्रतिबंध करण्यासाठी संबंधित ५ पोलीस ठाण्यांची समिती गठीत करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
बुलढाणा स्थित पोलीस मुख्यालयात आज दुपारी आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी ही महत्वपूर्ण दिली.