येथील खलील मणेर यांची लांजा नागरी पतसंस्थेच्या सापुचेतळे शाखेच्या सल्लागार समितीवर निवड

 

लांजा (प्रतिनिधी) शहरातील व्यापारी संघटनेचे माजी पदाधिकारी खलील मणेर यांची लांजा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सापुचेतळे शाखेच्या सल्लागार समितीवर निवड झाली आहे
खलील मणेर हे गेल्या अनेक वर्षांपासून लांजा तालुक्यात राजकीय, सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. लांजा नागरी सहकारी पतसंस्थेने संचालक मंडळाने खलील मणेर यांना पतसंस्थेच्या सापुचेतळे शाखेच्या सल्लागार समितीवर निवड केली आहे .याबाबत संस्थेचे चेअरमन शिवाजी कोत्रे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर रूमडे यांच्या सहीचे अधिकृत पत्र मणेर यांना प्राप्त झाले आहे.
दरम्यान सापुचेतळे शाखेच्या सल्लागार समितीवर सदस्य पदी निवड झाल्याबद्दल खलील मणेर यांचे अभिनंदन केले जात आहे.