सिंधुदुर्ग I मयुर ठाकूर : राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत सन २०२५ पर्यंत देश क्षयमुक्त करण्याचे धोरण शासनाने निश्चित केले आहे. त्यासाठी जिल्ह्यात नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. खोकला असल्याचे आढळून आल्यास त्याच्या थुंकीचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात क्षयरोगाचे काही रुग्ण असून, आरोग्य विभागाकडून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
….तर तातडीने वैद्यकीय रुग्णालयात जा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.!
क्षयरोगाची काही ठरावीक लक्षणे असून, ती जाणवल्यास उपचार घेणे गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख्याने दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीत खोकला असणे, खोकताना थुंकीवाटे रक्त पडणे, विशेषतः रात्री ताप येणे, भूक कमी लागणे आदी क्षयरोगाची लक्षणे आहे. ही लक्षणे आढळून आल्यास तत्काळ डॉक्टरांना दाखवावे.
Health related..! A persistent cough is not TB?
जिल्ह्यात क्षयरोगाचे काही रुग्ण?
▪️जिल्ह्यात क्षयरोगाचे काही रुग्ण असून, त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत.
▪️क्षयरोग झाल्यास रुग्णाच्या कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम होतो.
▪️कोरोनानंतरच्या काळात क्षयरोग रुग्णांचे निदान होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे.
क्षयरोग नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न..!
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील १० हजार घरांचे किंवा एकूण लोकसंख्येपैकी ५ टक्के लोकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातून क्षयरोगाचे रुग्ण कमी करण्यास मोठी मदत होणार आहे.
– अधिकारी
जिल्हा क्षयरोग विभाग, सिंधुदुर्ग