लांजा (प्रतिनिधी) ज्ञान प्रसारक अभियान मुंबई या संस्थेच्या वतीने करिअर मार्गदर्शन आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ रविवार दिनांक ९ जुलै रोजी सकाळी १० ते ३ या वेळेत न्यू इंग्लिश स्कूल लांजा सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.
ज्ञान प्रसारक अभियान मुंबई या संस्थेच्या वतीने सन २०२२-२३ या वर्षांमध्ये तालुक्यातील इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच तालुक्यातील जी मुले/ मुली उच्च शिक्षण घेत आहेत त्या मुलांना डॉक्टर, इंजिनियर, वकील, मॅनेजर, सीए, एमबीए तसेच एमपीएससी, यूपीएससी या स्पर्धा परीक्षांमध्ये उच्चपदे कशी आत्मसात करता येतील या संदर्भात शिक्षण क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संबोधि करिअर अकॅडमी ठाण्याचे मंगेश बोरकर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच रत्नागिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, गटशिक्षणाधिकारी विजय बंडगर, लांजा तहसीलदार प्रमोद कदम तसेच पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पवार हे भूषवणार आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेचेसाठी प्रदीप पवार यांच्यासह प्रकाश कांबळे, अजय जाधव, महेंद्र पवार, राजू कांबळे , महेंद्र पवार, विजय जाधव, विजय पवार, अजय जाधव, लक्ष्मण धनावडे, विजय बेटकर आनंद कोंडकर आदी मेहनत घेत आहेत.