वैभववाडी जिल्हा बँक विकास अधिकारी प्रल्हाद कुडतरकर यांचा सन्मान

 

कर्ज वसुलीत केली उल्लेखनीय कामगिरी : संचालक दिलीप रावराणे यांनी केले अभिनंदन

वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी तालुक्यात विकास सोसायट्यांच्या कर्ज वसुलीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या येथील जिल्हा बँकेचे विकास अधिकारी प्रल्हाद कुडतरकर यांचा संचालक दिलीप रावराणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री कुडतरकर यांचे सर्व अधिकारी, कर्मचारी, सोसायट्यांचे चेअरमन, सचिव यांच्याकडूनही अभिनंदन केलेे जात आहे.
तालुक्यात एकूण 25 विकास संस्था आहेत. या सर्व संस्थांनी शंभर टक्के कर्जाची परत फेड केली आहे. जिल्हा बँकेने ठरवून दिलेल्या 30 जून या तारखेपुर्वी ही वसुली केली आहे. 100 टक्के परत फेड करणारा हा जिल्ह्यातील एकमेव तालुका आहे. संचालक दिलीप रावराणे यांनी श्री.कुडतरकर व संस्थांचे सचिव यांचे विशेष आभार मानले.
यावेळी शाखा सहा. व्यवस्थापक सुरेश रावराणे, जय सावंत, नगरसेवक प्रदीप रावराणे, विजय सावंत, आशिष रावराणे, सुरेश शेळके, सचिन रावराणे व कर्मचारी उपस्थित होते.