देवासमोरील समईमधील उंदराने नेलेली पेटती वात पडली महागात, कुणकवण येथे घरांनी घेतला पेट

देवासमोरील समईमधील उंदराने नेलेली पेटती वात पडली महागात

कुणकवण येथे घरांनी घेतला पेट
दोन लाखाचे नुकसान
देवगड :
देवासमोरील समईतील पेटती वात घेवून जाणाèया उंदरामुळे घरच पेटल्याची घटना कुणकवण बंदरवाडी येथे घडली असून या अग्नितांडवामध्ये अर्धे घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.यामध्ये सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी सकाळी ११ वा.सुमारास निदर्शनास आली.दरम्यान या घटनेवेळी घरात कोणीही नव्हते.
कुणकवण बंदरवाडी येथील लक्ष्मण येसू घाडी हे बुधवारी सकाळी खारेपाटण येथे गेले होते तर त्यांची पत्नी कुणकवण शाळेमध्ये शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी गेली होती.दरम्यान घाडी यांचे घर बंद होते तर त्यांच्या देवघरातील देवापुढे समइ लावलेली होती.उंदराने समईतील पेटती वात पळव{ली मात्र ती वात घाडी यांनी घरात ठेवलेल्या कपड्यांवर पडून आगीचा भडका उडाला व घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
याचदरम्यान बंदरवाडी येथील रहिवासी आनंद ठाकूरदेसाई यांना घर पेटत असल्याचे दिसताच त्यांनी धावाधाव करून  ग्रामस्थांच्या मदतीने घर आग विझवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत निम्मे घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.घराचे वासे, कौले, घरातील संसारोपयोगी साहित्य कपडे, मिक्सर, कुकर तसेच किंमती वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.
स्थानिक नागरिक  आनंद ठाकूरदेसाई यांनी याबाबत पोलीस पाटील पाटील सचिन राणे यांना कळवले.त्यांनी वि जयदूर्ग पोल{स स्टेशनला कळव{ल्यानंतर पोल{स घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा केला यावेळी आगीमध्ये सुमारे दोन लाखाचे नुकसान झाल्याचे पोल{सांनी सांगीतले.