सुकन्या प्रकाश भागवत हिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड

 लांजा तालुका भाजपा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला सत्कार

लांजा | प्रतिनिधी : शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील रहिवाशी प्रकाश भागवत यांची कन्या सुकन्या भागवत हिची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल लांजा तालुका भाजपा पदाधिकार्यां कडून तिचे अभिनंदन करण्यात आले.

लांजा नगरपंचायत प्रभाग क्रमांक १३ मधील रहिवासी असलेले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले प्रकाश भागवत यांची मुलगी सुकन्या प्रकाश भागवत तिची नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. याबद्दल या प्रभागाचे नगरसेवक संजय यादव तसेच भाजपा तालुकाध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेश खामकर यांनी तिच्या घरी जाऊन तिचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.