मुसळधार पावसातही निलेश राणे यांचे ‘शक्तिकेंद्र प्रमुख’ भेट अभियान

 

आपले हक्काचे माणूस आले भावनेतून ग्रामस्थांनी ही साधला निलेश राणे यांच्याशी मुक्त संवाद 

मालवण | प्रतिनिधी : मुसळधार कोसळणाऱ्या पावसातही मालवण कुडाळ भाजपा विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी बुधवारी मालवण तालुक्याचा दौरा सुरू ठेवत मोदी @ 9 अभियान अंतर्गत संपर्क अभियान माध्यमातून भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख व बूथ अध्यक्ष यांच्या भेट घेत संवाद साधला. गेले काही दिवस संपर्क अभियान माध्यमातून निलेश राणे विधानसभा मतदारसंघात सातत्याने विविध भागात भेट देत आहेत. आपले हक्काचे माणूस घरी आले या भावनेतून ग्रामस्थांच्या माध्यमातून ही निलेश राणे यांचे उत्स्फूर्त स्वागत करत आपुलकीने संवाद साधण्यात आला. सरकारच्या माध्यमातून झालेल्या व होत असलेल्या विकासकामांबाबत आभार व्यक्त करत नव्याने विकासकामांबाबत निलेश राणे यांच्याकडे हक्काने मागणी करण्यात आली. निलेश राणे यांच्याबाबत जनतेत असलेली आपुलकी व विकासकामे यांच्याच माध्यमातून होणार, हा विश्वास सर्वच ठिकाणी ग्रामस्थांच्या चर्चा, संवादातून दिसून आला.

काही ठिकाणी गाडीचा मार्ग नाही अश्या ठिकाणी वाहणाऱ्या पाण्यातून चालत जात, काही ठिकाणी डोंगर माथ्यावर राहणाऱ्या शक्ती केंद्र प्रमुख यांच्या घरी जात निलेश राणे यांनी संवाद साधत आढावा घेतला.

दरम्यान, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष, सरपंच, भाजप पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून विविध विकासकामांबाबत लेखी स्वरूपत मागणी निवेदन निलेश राणे यांच्याकडे देण्यात आली. जिल्हा नियोजन, राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून प्राधान्य क्रमाने विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे निलेश राणे यांनी सांगितले. यावेळी सरपंच यांच्याशी संवाद साधताना गावाला अपेक्षित आहे. त्यानुसार विकासकामांना प्राधान्य द्या. बूथ अध्यक्ष, शक्तीकेंद्र प्रमुख यांचीही शिफारस विकासकामे प्रस्तावित करताना घ्या. त्यांचेही स्थान संघटना व विकास प्रक्रियेत महत्वाचे आहे. असे निलेश राणे यांनी सांगितले.

मालवण तालुक्यात मोदी @9 अभियान अंतर्गत शक्तिकेंद्र प्रमुख संपर्क अभियांनांतर्गत दुसऱ्या टप्प्यात बुधवारी निलेश राणे यांनी तालुक्यातील शक्तिकेंद्र प्रमुखांच्या घरी भेट देत संपर्क अभियानाचा आढावा घेतला.

या भेटीत संघटनात्मक चर्चा तसेच मतदारसंघात सुरू असलेल्या घरो घरी संपर्क अभियानाचा आढावा घेण्यात आला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ 9090902024 या नंबरवर मिस्ड कॉल देत समर्थन देण्याचे आवाहन निलेश राणे यांनी केले आहे. तसेच ९ वर्षातील केलेल्या कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, अनंत राऊत, माजी सभापती सुनील घाडीगांवकर, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, माजी सभापती अजिंक्य पाताडे, माजी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, बाळू कुबल, भाजप युवमोर्चा तालुकाध्यक्ष सुशांत घाडीगांवकर, विक्रांत नाईक, मकरंद राणे, संतोष कोदे, दादा नाईक, हरीश गांवकर, नारायण लुडबे, अवधूत हळदणकर, यासह नांदोस, सुकळवाड, माळगाव, चिंदर, आचरा, श्रावण, किर्लोस, हिवाळे आदी ठिकाणी शक्तिकेंद्र प्रमुख विजय निकम, विनायक परब, विरेश पवार, निलेश खोत, दीपक सुर्वे, दत्ता वराडकर, निलेश बाईत, अभिजित सावंत, प्रवीण घाडीगांवकर, बबन परब, यासह बूथ अध्यक्ष, विद्याधर पार्टे, सदाशिव कारावडे, स्वप्नील गावडे, गौरव सावंत, नांदोस सरपंच माधुरी चव्हाण, सागर नांदोसकर, निलेश पेडणेकर, वैशाली घाडीगांवकर, तिरवडे सरपंच रेश्मा गावडे, उपसरपंच सुशील गावडे, माळगाव सरपंच चैताली साळकर, वायंगवडे सरपंच विशाखा सकपाळ, हेदुळ सरपंच, किर्लोस सरपंच साक्षी चव्हाण संतोष बाईत, अण्णा राऊत, शिवराम परब, विश्वनाथ परब, संजय सावंत, सुभाष सावंत, शेखर जंगम, भास्कर लाड, नरेश कामतेकर यासह अन्य उपस्थित होते.

निलेश राणे यांचे अधिकाऱ्यांना थेट फोन

गावागावात ग्रामस्थ यांच्या माध्यमातून काही विकासकामे सूचित करताना प्रशासन स्तरावरील वीज, बीएसएनएल, सार्वजनिक बांधकाम बाबत काही समस्या मांडल्या जात होत्या. यातील ज्या समस्या तात्काळ सुटू शकतात त्याबाबत अधिकारी वर्गाला थेट फोन करून तात्काळ उपाययोजना तसेच समस्या सोडवण्याबाबत निलेश राणे यांनी ग्रामस्थांसमोरच अधिकारी वर्गाला सांगितले. बागायत येथील काही घरात पाणी जात होते त्याबाबत बांधकाम अधिकाऱ्यांना निलेश राणे यांच्या फोन जाताच तात्काळ उपाययोजना करण्यात आल्या. याबाबत ग्रामस्थांनी समाधान मानले.