मसुरे | झुंजार पेडणेकर : नवसाला पावणारी व हाकेला धावणारी अशी ख्याती असलेल्या मालवण तालुक्यातील मसुरे बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिरचा वार्षिक आषाढी जत्रोत्सव ८ जुलै २०२३ रोजी संपन्न होत आहे. जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी बुधवारी सायंकाळी जलमंदिर येथे भेट देत यात्रा पूर्व नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी त्यांचे स्वागत श्री सातेरी देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सीताराम उर्फ भाई सावंत यांनी केले.
देवालय ट्रस्ट व ग्रामस्थ यांच्या वतीने केलेल्या नियोजना बाबत यावेळी त्याना माहिती देण्यात आली. भाविकांची दर्शन रांग व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, वाहनतळ, तसेच पावसाळा असल्याने मंडप व्यवस्था याबाबत माहिती घेतली. ग्रामस्थांच्या नियोजनाला पोलीस प्रशासनाची साथ लाभेल असे यावेळी पो नि प्रवीण कोल्हे यांनी सांगितले. यावेळी
श्रीदेवी सातेरी देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सिताराम सदाशिव सावंत, बिळवस ग्रामपंचायत सरपंच सौ मानसी पालव, ग्रामपंचायत सदस्य संतोष पालव, मसुरे पोलीस प्रमोद नाईक, माजी पोलीस पाटील गोविंद सावंत, माळगाव पोलीस पाटील रमाकांत जाधव आणि बिळवस ग्रामस्थ उपस्थित होते.सुत्रसंचलन व आभार ग्रा सदस्य संतोष पालव यांनी मानले.