चिपळूण | वार्ताहर : नमन लोककला मंडळ रत्नागिरी जिल्हा या संघटनेची कार्यकारिण सभा देवरुख हॉटेल पार्वती पॅलेस येथे सकाळी ११.३० वाजता पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर कांबळे होते.
या सभेमध्ये प्रथम मृत झालेल्या झालेल्या कलाकारांना संघटनेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. तर काही अभिनंदनाचे ठराव सुद्धा सदस्यांनी सूचित केल्याप्रमाणे घेण्यात आले. त्यानंतर मागील सभेचे इतिवृत्त सचिव परशुराम मासये यांनी वाचून दाखवले त्याला सर्वांनी मंजुरी दिली. या सभेमध्ये नमन लोककला संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा करण्यात आली.
संगमेश्वर तालुका आणि युत्युसू आर्ते यांनी सभेचे आयोजन केले होते. यावेळी सर्वांचे स्वागत श्री आर्ते यांनी डायरी आणि पेन देत केले.
या ठिकाणी शाल किंवा पुष्पगुच्छ न देता शैक्षणिक साहित्य देऊन सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर मागील सभेत ज्या विषयावरती चर्चा झाली होती. ते विषय मार्गे लागले का? यावर चर्चा झाली. नमन मंडळांना प्रयोग सादर करताना किंवा प्रवासात काही अडचणी आल्या का? या संदर्भात विचारण्यात आले. अडचणी न आल्याचे सांगितले. यावर सर्वांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर जिल्हा संघटनेचे तालुक्यातून सदस्य नोंदणी करणे बंधनकारक यावर ते विचारविनिमय करण्यात आले. या प्रश्नावर उपाध्यक्ष मोहन घडशी आणि इतर सदस्यांनी सविस्तर चर्चा केली. वृध्द कलाकार मानधन जे मिळते त्याबाबत चर्चा झाली. यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील 54 कलाकाराना मंजुरी मिळाली असल्याची माहिती अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी दिली .त्यावर सर्वांनी समाधान व्यक्त केले. यासाठी स्वतः अध्यक्ष प्रभाकर कांबळे वारंवार संपर्क करून कलाकारांना मानधन साठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करीत असल्याने ते दिसून आले. वृद्ध कलाकारांना मानधन मिळवताना उत्पन्न 48 हजार पर्यंत असावे अशी अट आहे. मात्र, ही उत्पन्न मर्यादा वाढवावी अशी सर्व कार्यकारिणी सभासदांनी सूचना केली. त्याचबरोबर मानधन मिळण्याचे अ,ब आणि क असे वर्ग आहेत. नमन कलावंत क वर्गात असून त्याला ब वर्गाचे मानधन मिळावे यासाठी प्रयत्न करायचे ठरले .
शेवटी अध्यक्ष श्री कांबळे यांनी मार्गदर्शन केले. आभार श्री आर्ते यांनी मानले.