ग्रामविकास अंतर्गत च्या निविदा अल्पमुदतीच्या करा ; भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली…!

कणकवली : सन २०२२ – २०२३ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका होणार असल्यामुळे लागणाऱ्या आचारसंहितेचा काळ पाहता विकास कामे पूर्ण होण्यास अडचणी निर्माण होणार आहेत.

Tenders under Village Development shall be of short duration; BJP District President Rajan Teli...!

सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंदर्भात अल्पमुदतीमध्ये निविदा प्रक्रिया करण्याचा शासन निर्णय केला आहे. त्या धर्तीवर आपल्या ग्रामविकास अंतर्गत येणाऱ्या विकास कामाची निविदा प्रक्रिया ही अल्प मुदतीमध्ये करण्यासंबंधी आदेश निर्गमित करावे अशी मागणी भाजपा चे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे