पाटपन्हाळे महाविद्यालयात वृक्षारोपण

 

सामाजिक वनीकरण विभाग गुहागर आणि पाटपन्हाळे महाविद्यालय यांचा संयुक्त उपक्रम

गुहागर l प्रतिनिधी : गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला , वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील एनएसएस विभागाच्या वतीने दिनांक 3 जुलै ते आठ जुलै या कालावधीत वन महोत्सव सप्ताह अंतर्गत विविध ठिकाणी वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सामाजिक वनीकरण विभाग गुहागर आणि वनविभाग गुहागर यांच्या सहकार्याने पाटपन्हाळे येथील श्री देव गडगोबा देवस्थान परिसरात आज वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कृष्णाजी शिंदे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली एनएसएस विभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण सनई व डॉ. प्रसाद भागवत यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन केले होते. तृतीय वर्ष कला वर्गातील एनएसएस स्वयंसेवकांनी वृक्षारोपण कार्यक्रमात सर्व ती मदत केली. यावेळी बदाम, चिंच, आवळा, बेल अशा विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली. महाविद्यालयामधील कला शाखा विभाग प्रमुख प्रा. प्रमोद देसाई, अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे प्रमुख प्रा. लंकेश गजभिये, डॉ. दिनेश पारखे, डॉ.जालिंदर जाधव तसेच कार्यालयीन कर्मचारी संदीप चव्हाण यांच्या हस्ते वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी गुहागर सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल श्री. अमित निमकर गुहागर, श्री. संतोष परशेट्ये वनपाल गुहागर

वनरक्षक श्री. मांडवकर आणि

वनरक्षक श्री. दुंडगे उपस्थित होते. महाविद्यालयाने या महिन्यात सुमारे ५० वृक्षांची लागवड व संवर्धन करण्याचे नियोजन केले आहे याबद्दल वनविभाग गुहागर यांचेवतीने शुभेच्छा देण्यात आल्या.