राजकीय उलथापालथीमुळे राज ठाकरेंचा निर्णय
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा ८ जुलै रोजी होणारा चिपळूण दौरा आता पुढे ढकलण्यात आला आहे. राजकीय उलथापालथीमुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.
राज्यातील राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे आधी मुंबईत मेळावा घेणार आहेत आणि त्यानंतर ते महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी ही माहिती दिली.
८ जुलै रोजी राज ठाकरे हे चिपळूण, खेड आणि दापोलीच्या दौऱ्यावर येणार होते. राज ठाकरे मुंबईमध्ये मेळावा घेऊन सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आपली भूमिका स्पष्ट करून मग चिपळूण, खेड आणि दापोली दौरा करतील व त्याची सुधारित तारीख आपणास कळविण्यात येईल, असे वैभव खेडेकर यांनी सांगितले आहे.