चौघांवर गुन्हा दाखल
दारुसह 6 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त
खेड | प्रतिनिधी : मौजे कुळवंडी, देऊळवाडी, खेड आणि आजूबाजूला असणाऱ्या १किमीच्या जंगलमय व डोंगर भागांमध्ये ओढ्या जवळ असणाऱ्या हातभट्टी दारू धंद्यावर या पथकामार्फत धडक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई 0५/0७/२०२३ रोजी सकाळी ७.०० वा. करण्यात आली.
या पथकामार्फत वरील नमूद ठिकाणी छापे टाकण्यात आले, व एकूण 4 इसमांना वेगवेगळ्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच एका ठिकाणी हातभट्टी ही बेवारस असल्याचे अढळले.
या कारवाईमध्ये 1) मंगेश दगडू निकम 2) सुरेश रुमाजि निकम 3) संतोष जयरम निकम 4) अशोक लक्ष्मण निकम सर्व राहणार खेड यांच्याकडे व अन्य एका ठिकाणी बेवारस स्थितीत मिळून आलेल्या हातभट्टी साठी लागणारा दारु साठीचा गूळ, नवसागर, हातभट्टी दारू, असा एकूण ₹६,६०,८७० किंमतीचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला व खेड पोलीस ठाणे येथे या सर्वांविरुद्ध खालील नमूद 5 वेग वेगळे
1) गुन्हा रजिस्टर नंबर 188/2023 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65(ब), (क), (ई),
2) गुन्हा रजिस्टर नंबर 190/2023 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (ई),
3) गुन्हा रजिस्टर नंबर 191/2023 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (ई),
4) गुन्हा रजिस्टर नंबर 186/2023 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (ब), (क), (ड),(फ),(ई),
5) गुन्हा रजिस्टर नंबर 187/2023 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (ई),
गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच हातभट्टी, दारूच्या टाक्या, रसायन असा मुद्देमाल या पथकामार्फत जागीच समूळ नष्ट करण्यात आलेला आहे.
या चारही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तसेच या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोठेही अवैध दारू धंदे चालू राहणार नाहीत याची दक्षता घेणेबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. तसेच गुन्हे प्रतिबंध, गुन्हे तपास आणि अवैध धंद्याविरुद्ध चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांना बक्षीस योजना सुरू करून मासिक गुन्हे आढावा बैठकी दरम्याने प्रोत्साहित केले आहे. याचं पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी खेड श्री. राजेंद्र मुनगेकर यांनी गोपनीय माहिती मिळाली की, खेड पोलीस ठाणे हद्दीमध्ये काही ठिकाणी हातभट्टी दारू धंदे चालू आहेत.
त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी खेड श्री. राजेंद्र मुनगेकर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत, 1) उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड श्री. राजेंद्र मुनगेकर, 2) पोलीस निरीक्षक, श्री. नितीन भोयर, खेड पोलीस ठाणे, 3) पोऊनि. श्री. सुजीत सोनवणे, खेड पोलीस ठाणे, 4) पोहेकॉ/476 श्री. दीपक गोरे, 5) चा.पोहेकॉ/645 श्री. महेंद्र केतकर, 6) चा.पोहेकॉ/213 श्री. दिनेश कोटकर, 7) पोहेकॉ/697 श्री. विक्रम बुरोंडकर,
8) पोकॉ/114 श्री. विनय पाटील,
9) पोकॉ/920 श्री. रमेश बांगर,
10) चा.मपोकॉ/1036 श्रीमती. लतिका मोरे,
11) पोकॉ/1315 श्री. रुपेश जोगी,
12) पोकॉ/1291 श्री. अजय कडू,
13) पोकॉ/823 श्री. राहुल कोरे,
14) पोकॉ/815 श्री. जोयशी व
15) पोकॉ/66 श्री. कृष्णा बांगर यांचा समावेश होता.