मागासवर्गीय मुला- मुलींच्या शासकीय वसतीगृहातील रिक्त जागेवर प्रवेश प्रक्रिया

रत्नागिरी : सन 2023-24 साठी मागासवर्गीय मुला- मुलींच्या शासकीय वसतीगृहातील रिक्त असणाऱ्या जागेवर प्रवेश प्रक्रियाबाबत विद्यार्थी, विद्यार्थीनीकडून ऑफलाईन पध्दतीने अर्जाची नोंदणी करण्यात येत आहे. मागासवर्गीय गरजू विद्यार्थी, विद्यार्थीनीनी वसतीगृह प्रवेश अर्ज विनामुल्य प्राप्त करून घेण्यासाठी कार्यालयीन वेळेत संबंधित वसतीगृहातील गृहपाल, अधिक्षिका व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, रत्नागिरी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन यादव गायकवाड सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रत्नागिरी यांनी केले आहे.
शालेय विद्यार्थ्यांनी ऑफलाईन प्रवेशासाठी 12 जुलै पर्यंत अर्ज करावयाचा असून पहिली निवड यादी 14 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्याच्या प्रवेशाची अंतिम मुदत 23 जुलै आहे. रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवतेनुसार निवड यादी 26 जुलै 2023 रोजी प्रसिध्दज करण्यात येईल. दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना 2 ऑगस्ट पर्यंत प्रवेश देण्यात येईल.
इयत्ता दहावी व अकरावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी (व्यावसायीक अभ्यासक्रम वगळून) ऑफलाईन प्रवेशासाठी 31 जुलै पर्यंत अर्ज करावयाचा असून पहिली निवड यादी 7 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्याच्या प्रवेशाची अंतिम मुदत 17 ऑगस्ट असून रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवतेनुसार निवड यादी 23 ऑगस्ट रोजी प्रसिध्दऑ करण्यात येईल. दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना 31 ऑगस्ट पर्यंत प्रवेश देण्यात येईल.
बी.ए./बी. कॉम/ बी.एस.सी अशा बारावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका /पदवी आणि एम.ए./एम.कॉम / एम.एस.सी. असे पदवीनंतरचे पदव्युत्तर, पदवी, पदविका इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) ऑफलाईन प्रवेशासाठी 31 जुलै पर्यंत अर्ज करावयाचा असून पहिली निवड यादी 7 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्याच्या प्रवेशाची अंतिम मुदत 17 ऑगस्ट आहे. रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवतेनुसार निवड यादी 23 ऑगस्ट रोजी प्रसिध्दट करण्यात येणार असून दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना 31ऑगस्ट पर्यंत प्रवेश देण्यात येईल, अशी माहिती समाजकल्याण कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.