संगमेश्वर : संगमेश्वर मधील प्रसिद्ध फोटोग्राफर आणि व्यवसायिक योगेश राजाराम सुर्वे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले, ते 52 वर्षाचे होते.
संगमेश्वर येथे फोटोग्राफर म्हणून काम करत असताना ते व्यवसायानिमित्त मुंबई येथे स्थित झाले होते. गुरुवारी सकाळच्या दरम्याने आलेल्या तीव्र झटक्याने त्यांचे दुःखद निधन झाले.
तरुण व्यवसायिक आणि फोटोग्राफर च्या दुःखद निधनाने तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगी भाऊ आई नातू आदी परिवार आहे. संगमेश्वर मधील प्रसिद्ध प्रेस फोटोग्राफर मकरंद सुर्वे यांचे ते मोठे बंधू होते.