लांजा (प्रतिनिधी) वेरवली पंचक्रोशी शिक्षण संस्था मंडळ संचलित श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुकमध्ये सन २०२३-२४ मधील पहिली शिक्षक पालक सभा उत्साहात पार पडली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदाशिव पाध्ये होते .पालक वर्गाचे स्वागत झाल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.गांगण यांनी प्रास्ताविक केले. मागील शैक्षणिक वर्षाचा आढावा घेताना विद्यालयाच्या यशस्वी वाटचालीबाबत त्यांनी माहिती दिली. तर शिक्षक श्री .बंडगर यांनी विद्यार्थी हिताच्या विविध शिष्यवृत्ती योजना बाबत माहिती दिली. त्यानंतर शिक्षक पालक संघाची स्थापना करण्यात आली. इयत्ता पाचवी ते दहावी प्रत्येक वर्गासाठी प्रतिनिधी स्वरूपात एका पालकाची निवड करण्यात आली .
पालक निधी, युवा क्रीडा निधीबाबत पालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पुढील शैक्षणिक वर्षांमध्ये होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देताना संस्थेकडून होत असलेल्या आर्थिक योगदानाचे महत्त्व शिक्षक श्री. डोळे यांनी सांगितले. पालकांकडून आलेल्या सूचनांचे पालन करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा कटिबद्ध असल्याची माहिती सदाशिव पाद्ये यांनी दिली. सभेचे सूत्रसंचालन श्री. डोळे यांनी तर आभार श्री. कांबळे यांनी मानले.