मिरजोळे पाटीलवाडी येथे बेकायदेशिरपणे गावठी हातभटटीवर कारवाई

रत्नागिरी | प्रतिनिधी : शहरानजीकच्या मिरजोळे पाटीलवाडी येथे बेकायदेशिरपणे गावठी हातभटटीची दारु विक्रीसाठी जवळ बाळगणार्‍या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई बुधवार 5 जुलै रोजी सकाळी 8 वा.करण्यात आली. चेतन धोंडू सकपाळ असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.बुधवारी सकाळी शहर पोलिसांना मिरजोळे-पाटीलवाडी येथे बेकायदेशिरपणे गावठी दारुची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार,शहर पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकली असता त्यांना संशयित चेतन सकपाळ हा गैरकायदा बिगर परवाना गावठी हातभटटीची दारु बनवण्यासाठी लागणारे गुळ व नवसागर मिश्रीत कुजके रसायन तसेच इतर साहित्य आणि गावठी दारु विक्रीसाठी जवळ बाळगून असताना मिळून आला.त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ब),(क),(ड),(फ),(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.