रत्नागिरी ः प्रतिनिधी
पूर्णगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपघात हेाउन बेशुध्द अवस्थेत पडलेल्या प्रौढाचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात मंगळवार 4 जुलै रोजी सायंकाळी 6.20 वा.मृत्यू झाला.
राजेंद्र श्रीकांत मुंगळी (45,रा.क्रांतीनगर झोपडपटटी,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.शनिवार 1 जुलै रोजी सकाळी 10.30 वा.राजेंद्र मुंगळी हे आपल्या ताब्यातील दुचाकी घेउन बाहेर गेले होते.त्यानंतर ते पूर्णगडपोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या इटलादेवी स्टॉप रस्त्यावर बेशुध्द अवस्थेत पडेलेल मिळून आले होते.तेथील ग्रामस्थांनी त्यांना जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता मंगळवारी सायंकाळी उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.