मिरजोळे-पडवेवाडी येथे मटका जुगार खेळणार्‍यावर कारवाई

रत्नागिरी ः प्रतिनिधी
मिरजोळे-पडवेवाडी बसस्टॉपच्या मागील बाजुस मटका जुगार खेळ चालवणार्‍या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई मंगळवार 4 जुलै रोजी सायंकाळी 6.35 वा.करण्यात आली असून त्याच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 1 हजार 577 रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
विजय भुजंग जाधव (31,रा.रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.शहर पोलिसांना मिरजोळे पडवेवाडी येथे मटका ज्ाुगार खेळ चालवण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार,पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी त्याठिकाणी धाड टाकून ही कारवाई केली होती.त्याच्याविरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.