आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस कर्मचार्‍यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू

रत्नागिरी ः प्रतिनिधी
अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केलेल्या पोलिस कर्मचार्‍यावर कोल्हापुर येथे अधिक उपचार सुरु असून तो शुध्दीवर आला आहे.महेश किर (30,रा.टिआरपी,रत्नागिरी) असे कोल्हापूर येथे उपचार सुरु असलेल्या पोलिस कर्मचार्‍याचे नाव आहे.महेश किर हे पूर्णगड पोलिस ठाण्यात कार्यरत असून काही दिवसांपूर्वी त्यांनी अज्ञात कारणातून राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले होते.त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना प्रथम जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते.परंतू त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला हलवण्यात आले.त्याठिकाणी ते शुध्दीवर आले असून त्यांच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा झाली आहे.दरम्यान,त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला याचे कारण समजू शकलेले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.