खेड | प्रतिनिधी : दापोली तालुक्यातील आसोंड या ठिकाणी झालेल्या ट्रक आणि मॅक्झिमो अपघातामध्ये ९ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ट्रॅक चालक फरीद रहीस खान (वय: २९ रा. राजस्थान) याची दि. ५ जुलै रोजी जामीनवर मुक्तता करण्यात आली.
दापोली तालुक्यातील जोशी आळी येथील दापोली हर्णे रोडवर २५ जून रोजी दुपारी २. ४५ वाजण्याच्या सुमारास फरीद रहीस खान हे आपल्या ताब्यातील ट्रकने समोर येणाऱ्या मॅक्झिमो वाहनाला अति वेगाने धडक देवून झालेला अपघातात ९ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता व ७ प्रवाशांना गंभीर व किरकोळ स्वरूपाची दुःखापत झाली होती.
या अपघातानंतर ट्रक चालक फरीद रहिस खान घटनास्थळावरून पळून गेला होता. या प्रकरणी चालक फरीद खान यांच्याविरुद्ध दापोली पोलिसांनी भा.द.वि.का. कलम ३०४, ३०४ अ, २७९, ३३७,३३८ व मो.वा.का कलम १८४ १३४अ, १३४ ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दापोली न्यायालयात आरोपी याला हजर केली असता, आरोपीस १ दिवसीय पोलीस कोठडी व त्यांनतर ११ जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी मध्ये ठेवण्यात आले. याप्रकरणी आरोपीच्या वतीने खेड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात खेडचे सुप्रसिद्ध वकील ॲड. प्रियेश सुहास तलाठी यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. ॲड. प्रियेश सुहास तलाठी यांनी केलेला युक्तिवाद व दाखल केलेल्या विविध उच्च न्यायालयाचे केस लॉ ग्राह्य धरून आरोपीची खेड येथील अति जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीची जामीनावर मुक्तता केली.