Kankavli:पाण्यात वाहून महिलेचा मृत्यू

*कणकवलीतील शिरवलगावात शोककळा*
कणकवली

तहसीलदार कणकवली यांचेकडून प्राप्त माहिती नुसार आज दिनांक 06 जून 2023 रोजी मौजे शिरवल तालुका कणकवली येथील श्रीमती प्रचिती प्रशांत कुडतरकर वय.३६ वर्षे ह्या दुपारी ठीक तीन च्या आसपास कपडे धुण्यासाठी गेल्या असता पाण्यात वाहून जाऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे.
सदर मयत व्यक्तीचा मृतदेह मिळालेला असून त्याबाबत पंचनामा व पुढील कार्यवाही सुरू आहे सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडून माहिती देण्यात आली.

याची माहिती कणकवली तहसीलदार पवार यांनी दिली.