कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, रेल्वे स्टेशन रोड येथे राहणारे महेश गंगाराम आजगावकर यांच्या निवासस्थानी संत गाडगे महाराज यांची ६६ वी पुण्यतिथी १२ डिसेंबर रोजी साजरी होणार आहे
या निमित्ताने सकाळी १० वाजता संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, अभिषेक व आरती नंतर तीर्थप्रसाद होणार आहे तसेच दुपारी ३ वाजता वाजता नामदेव महाराज भजन मंडळाचे नामस्मरण, रात्री ९ वाजता गांधी चौक सिद्धिविनायक भजन मंडळाचे भजन होणार आहे तरी सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन महेश आजगावकर यांनी केले आहे.