वेंगुर्ले येथील त्रैवार्षिक मराठी साहित्य संमेलनाला ग्रंथदिडीने प्रारंभ

उद्या सकाळी होणार साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन

वेंगुर्ले : दाजी नाईक
आनंदयात्री वाङ्मय मंडळासह अन्य सहयोगी संस्थांनी आयोजित केलेल्या वेंगुर्ला तालुका त्रैवार्षिक तिसरे मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला वेंगुर्ले शहरातून काढण्यात आलेल्या ग्रंथदिडीने शहर परिसर साहित्य नगरीमय बनले होते.
वेंगुर्ले येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या प्रांगणातून या ग्रंथ दिंडीला प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीचे उद्घाटन पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवू करण्यात आले.
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वेंगुर्ले मध्ये गेले काही दिवस स्पर्धा आणि कार्यक्रम संपन्न झाले. आज सायंकाळी बॅ.खर्डेकर महाविद्यालय ते संमेलन स्थळापर्यंत (साई मंगल कार्यालय) ग्रंथदिडी काढण्यात आली. या ग्रंथदिडीत मठ येथील रा.धों. खानोलकर हायस्कूलचे लेझीम पथक, बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे एनएसीसी कॅडेटस् तसेच संत परंपरा दाखविणारा चित्ररथ सहभागी झाले होते. यावेळी आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्या अध्यक्ष तथा प्रसिद्ध लेखिका वृंदा कबळी, प्रा.सचिन परुळकर, रविद्र परब, राजाराम नाईक, आत्माराम बागलकर, सुनिल नांदोसकर, शरद कांबळी, अजित वसंत राऊळ, महेश राऊळ, शैलेश जामदार, प्रसाद खानोलकर, रमण खानोलकर, प्राचार्य विलास देऊलकर, प्रा. आनंद बांदेकर, संजय पाटील, गुरुदास तिरोडकर, महेंद्र घाडी, डॉ.पूजा कर्पे, वृंदा गवंडळकर, चारुता दळवी, शिल्पा पाटील, महिमा घाडी, माधवी मातोंडकर, किरात ट्रस्टचे अॅड.शशांक मराठे, सीमा मराठे, ‘माझा वेंगुर्ला‘चे निलेश चेंदवणकर, यासीर मकानदार, कपिल पोकळे, अमृत काणेकर, डॉ.संजिव लिगवत यांच्यासह बहुसंख्य साहित्यप्रेमी या ग्रंथ दिंडीत सहभागी झाले होते.