महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या परिक्षांमध्ये यश
सावंतवाडी । प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या सर्टिफिकेट कोर्स इन इन्फॉमेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटराईज्ड अकाऊटिंग ॲण्ड ऑफिस ऑटोमेशन आणि सर्टिफिकेट कोर्स इन डेस्कटॉप पब्लिशिंग या अभ्यासक्रमांमध्ये सावंतवाडीतील प्रभावती कॉम्प्युटर एज्युकेशन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटराईज्ड काऊटिंग ॲण्ड ऑफिस ऑटोमेशन या अभ्यासक्रमात प्राजक्ता हुमरसकर ( ८३.७५ टक्के) जिल्ह्यात पहिली, चेतना मांजरेकर (७८.२५ टक्के) जिल्ह्यात दुसरी तर ऋत्विक गोसावी (७८.०० टक्के ) व ऐश्वर्यानंद सावंत (७८.०० टक्के ) हे जिल्ह्यात तिसरे आले. सर्टिफिकेट कोर्स इन इन्फॉमेशन टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांत दिव्येश गावडे (७९.२५ टक्के ) हा जिल्ह्यात पहिला व शिवांगी राऊळ व आकाश गावडे (७८.२५ टक्के ) जिल्ह्यात दुसरा व दिपाली नाईक (७७.०० टक्के ) जिल्ह्यात तिसरी आली. सर्टिफिकेट कोर्स इन डेस्कटॉप पॅब्लिशिंग या अभ्यासक्रमांत प्रतिक्षा ताडेल (८८.०० टक्के ) ही जिल्ह्यात पहिली आली. वृषाली गुरव (८३.७५ टक्के ) ही जिल्ह्यात दुसरी सिध्दी जाधव (८२.५० टक्के ) ही जिल्ह्यात तिसरी आली.
या तिनही अभ्यासक्रमांसाठी संस्थेमधून ७५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात अमित नाईक, राखी नेमण, तेजल राऊळ, मयुर घाडी, दिपाली मेस्त्री, केदार नाईक, रिया मुळीक, महेक पटेल, ओंमकार पाडगांवकर, प्रथमेश गोसावी, संभाजी धोगळे, मोनिका पाटकर, रुतुजा माळकर, वैष्णवी लातये, नम्रता मसुरकर, सायली मुळीक, योगिता वराडकर, अमित सावंत, प्रतिक्षा नायर, स्नेहल धाऊसकर, ऐश्वर्या शिरोडकर, संकेत भाईडकर, शुभम भिसे, डिंपल मोदी, रोहन सावंत, दिप माणगांवकर, सिध्दी नाईक, आयान खान, प्रतिक्षा सावंत, श्यामसुंदर सावंत, सायली राणे, मेघश्याम केसरकर, भिकाजी जाधव, ओजस परब, पुजा शिरोडकर, रिधिमा मातोंडकर, नारायण तावडे, विपुल वारडकर, कुणाल वेंगुर्लेकर रोशन म्हाडेश्वर हे विद्यार्थी प्रथमश्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. प्राचार्य संदिप देवळी यांनी अभिनंदन केले.