कणकवली विद्यामंदिर येथे “जागर योजनेचा” कार्यक्रम यशस्वी

शासन स्तरावरून विविध शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांना मिळणार,दिली माहिती

कणकवली : शासनाने विद्यार्थ्यांना सुरू केलेल्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली येथे जागर योजनेचा कार्यक्रम यशस्वी पारोडला. मुख्याध्यापक पी. जे.कांबळे, पर्यवेक्षिका सौ जाधव, जेष्ठ शिक्षक अच्युत वणवे यांनी मार्गदर्शन केले. योजनांचा फायदा घेता यावा या विषयी पालकांना सोप्या पद्धतीने माहिती दिली व समाधान केले.
विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली येथे इयत्ता पाचवी ते दहावी तील विद्यार्थ्यांना शासन स्तरावरून विविध शिष्यवृत्ती योजना दिल्या जातात. पण पालकांना शासकीय योजने बद्दल अनभिज्ञता असते.अनेक कागदपत्रे काढताना अडचणी येतात. वेळेत कागदपत्रांची पुर्तता होत नाही . काही शिष्यवृत्ती ह्या परीक्षा घेऊन दिल्या जातात. त्यामुळे विद्यार्थी अभ्यास आणि सराव यापासून दूर रहातात. अशा अनेक अडचणीवर मात करण्यासाठी शासनाच्या जवळ जवळ चाळीस योजना व त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत या विषयी प्रशालेचे मुख्याध्यापक पी. जे कांबळे, पर्यवेक्षिका सौ जाधव मॅडम, जेष्ठ शिक्षक अच्युत वणवे यांनी मार्गदर्शन केले व योजनांचा जागर कार्यक्रम यशस्वी झाला.
तळागाळातील विद्यार्थ्यांच्या पालकांना या योजनेची माहिती करून दिली . त्यामुळे शिक्षणात शासनाचा आर्थिक हातभार लागल आणि मुलांचा शिक्षण स्तर उंचावेल अशी अपेक्षा आहे. यावेळी आभार श्री वणवे सर यांनी मांडले .