बागायत मार्गावरील साचलेल्या पाण्याचा प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून निकाली ; ग्रामस्थांनी मानले आभार
मालवण | प्रतिनिधी : मालवण कुडाळ भाजप विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांच्या कार्य तत्परतेचा अनुभव माळगाव बागायत ग्रामस्थांनी अनुभवला.
मोदी @ 9 अंतर्गत शक्ती केंद्र प्रमुख आणि बूथ प्रमुखांच्या भेटीगाठी घेण्यासाठी निलेश राणे माळगाव दौऱ्यावर असताना माजी सरपंच निलेश खोत व ग्रामस्थांनी बागायत पुलानजीक साचणारे पाणी ग्रामस्थांच्या घरात पाणी घरात घुसण्याची स्थिती निर्माण झाल्याचे सांगत प्रशासन स्तरावरून तात्काळ उपाययोजना व्हाव्यात याबाबत मागणी केली.
निलेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांना तात्काळ उपाययोजना करण्याची सूचना केली. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने अवघ्या काही तासात जेसीबीच्या सहाय्याने येथे गटार खोदाई व अन्य उपाययोजना करीत प्रश्न निकाली काढला. या बद्दल ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच निलेश खोत यांनी निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.