भाजपच्या वतीने मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचे स्वागत

 

मालवण | प्रतिनिधी : मालवण पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचे मालवण येथील भाजप पदाधिकारी यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.

यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, राजा गावडे, मोहन वराडकर, राजू बिडये, विनोद भोगावकर, विलास मुणगेकर, मंदार लुडबे, निलेश परब, भाई मांजरेकर आदी उपस्थित होते. यावेळी राजकीय, सामाजिक विषयावर चर्चा करण्यात आली.

फोटो : मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचे भाजप पदाधिकारी यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. (अमित खोत, मालवण)