कासार्डे, तळेरे, दारूम, ओझरम या गावात आदर्श आचार संहितेबाबत नागरिकांना मार्गदर्शन..!

Google search engine
Google search engine

उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे व पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांची उपस्थिती.!

कणकवली I मयुर ठाकूर : सध्या अनेक ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुका होऊ घातल्या आहेत. असे असताना गावातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये तसेच कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे व पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सागर खंडागळे यांच्या उपस्थितीत कासार्डे, तळेरे, दारूम, ओझरम या गावात आदर्श आचार संहितेबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी साधारणपणे ८० ते १०० नागरीक उपस्थित होते.