राजापूर (वार्ताहर): मध्यरात्री आकस्मिक आग लागून लाखो रूपयांचे नुकसान झालेल्या पवार इलेक्ट्रॉनिक्स चे मालक संजय पवार यांना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी 50 हजार रूपयांची तातडीची आर्थिक मदत केली आहे. भाजपाच्या महिला मोर्चा प्रदेश सचिव सौ. शिल्पा मराठे यांनी ही मदत श्री. पवार यांना शुक्रवारी सुपुर्द केली.
शहरातील मुख्य रस्त्यालगत राजापूर हायस्कुल नजीक असलेल्या पवार इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाला बुधवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या दुर्घटनेत श्री. पवार यांचे दुकान व आतील इलेक्ट्रॉनिक्स व स्टेशनरी सर्व वस्तु जळून खाक झाल्या. गेली अनेक वर्षे मेहनती उभारलेल्या या दुकानाचे एका क्षणात होत्याचे नव्हते झाले.
श्री. पवार यांचे झालेले नुकसान लक्षात घेता भाजपाच्या महिला मोर्चा प्रदेश सचिव सौ. शिल्पा मराठे यांनी याबाबतची माहिती नाम. चव्हाण यांना दिली. त्यांनी एक सामाजिक बांधिलकी या भावनेने तातडीने वैयक्तिक स्वरूपात 50 हजार रूपयांची मदत सौ. मराठे यांच्याकडे सुपुर्द करत श्री. पवार यांच्या प्रसंगात खारीचा वाटा उचलला.
सौ. मराठे यांनी श्री. पवार यांची निवास्थानी भेट घेत तातडीने त्यांच्याकडे ही मदत सुपुर्द केली. याप्रसंगी धनंजय मराठे, आनंद मराठे, सुभाष चव्हाण, राहुल राऊत, दिपक लांजेकर उपस्थित होते. श्री. पवार यांना त्यांच्या व्यवसायाची नव्याने उभारणी करता यावी म्हणून नाम. श्री. चव्हाण यांनी ही मदत केली असून शासन स्तरावरून व वैयक्तिक स्तरावर त्यांना अधिक मदत प्राप्त व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सौ. मराठे यांनी सांगितले.
फोटो 7 आरजेपी 3
जळीतग्रस्त पवार इलेक्ट्रॉनिक्सचे मालक संजय पवार यांना नाम. रविंद्र चव्हाण यांच्या मार्फत 50 हजाराची मदत सुपुर्द करताना भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव सौ. शिल्पा मराठे याप्रसंगी आनंद मराठे, सुभाष चव्हाण, राहुल राऊत, दिपक लांजेकर आदी.
Home महाराष्ट्र रत्नागिरी पवार इलेक्ट्रॉनिक्सचे मालक संजय पवार यांना नाम. रविंद्र चव्हाण यांच्याकडून 50 हजाराची...