आमदार नितेश राणे यांनी जेष्ठ नागरिकांना दिले कॅरम बोर्ड, बुद्धिबळ खेळाचे साहित्य
*कणकवली शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी केली होती मागणी
फोटो;:
कणकवली;
कणकवली शहरातील जेष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी कॅरम बोर्ड, बुद्धिबळ असे क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिले आहे. हे साहित्य जेष्ठ नागरिक संघाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. यावेळी भाजपचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या हस्ते हे साहित्य देण्यात आले. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री ,शहर अध्यक्ष अण्णा कोदे,जिल्हा उपाध्यक्ष राजश्री धुमाळे,महिला शहर अध्यक्ष प्राची कर्पे, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, युवा मोर्चा अध्यक्ष गणेश तळगावकर,उपाध्यक्ष सुभाष मालंडकर,गीतांजली कामत ,श्रेयस चिंदरकर आदी उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.