आजगाव येथे चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर वेंगुर्ले पोलिसांची धाड

आजगाव येथे चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर वेंगुर्ले पोलिसांची धाड

एका आरोपीसह तीन महिला ताब्यात

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई

वेंगुर्ले: दाजी नाईक
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दारू मटका जुगार यासारख्या अनैतिक धंद्यांबरोबरच वेश्याव्यवसाय ही चालू आहे हे आजच्या आजगाव येथील कारवाईमुळे समोर आले आहे.
वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, संतोष मधुकर लुडबे, वय 52 वर्षे, रा. आजगांव, माळयारवाडी, ता. सावंतवाडी हा अन्नपुर्णा सेक्स वर्कर वेल्फेअर फौंडेशन या संस्थेच्या नावाखाली महिला, मुली यांना आणून “वेश्याव्यवसाय” करीत आहेत. ही माहिती मिळाल्याने, सदर ठिकाणी त्यांनी स्वतः सह पोलीस सहाय्यक निरीक्षक श्री दाभोलकर, पोलीस कुबल, पो.हे.कॉ. वेंगुर्लेकर, पाटील, म.पो.हे.कॉ. चौहान, पो.हे.कॉ. सराफदार, राऊळ, परब, सावंत, कांडर, खडपकर, भाटे, व स्था. गु. अ. शा पोलीस निरीक्षक सिंधुदुर्ग व त्यांचे पथक पोलीस सहाय्यक शेळके, कोयंडे, केसरकर, काळसेकर, कदम, पोलीस कॉन्स्टेबल सरमळकर या पथकासह आजगाव येथे चालणाऱ्या वेश्या व्यवसाया वर धाड टाकली.
यावेळी केलेल्या तपासणीत तेथे वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या आरोपीसह तीन परराज्यातील महिला आढळून आल्या.
दरम्यान वेंगुर्ला पोलीस स्टेशन मध्ये भा. द. वि. क. ३७० सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५९ / THE IMMORAL TRAFFIC PREVENTION ACT (PITA) कलम ३, ४, ५ अन्वये दाखल करण्यात आलेला आहे. सदर छाप्या दरम्याने ३ पीडित महिला त्या ठिकाणी मिळून आल्याने त्यांना सुरक्षिततेसाठी महिला अंकुर केंद्र सावंतवाडी येथे पाठवीन्यात आले. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव हे स्वतः करीत असून आजची आजगावं येथील कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री सौरभ अग्रवाल व अप्पर पोलीस अधीक्षक श्री नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी सांगितले.