सोनाळी येथील घटना
वैभववाडी | प्रतिनिधी
वैभववाडी तालुक्यात तिस-या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपून काढले. शुक्रवारी सोनाळीत नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात म्हैस वाहुन गेली आहे. तर तीन घरांचे व एका गोठ्याचे असे एकूण १ लाख ६२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसाने नदी, नाले दुथडी भरुन वाहात आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जोरदार पावसाने खांबाळे येथील सुवर्णा बाबाजी अडुळकर यांच्या घरांचे ५ हजार , योगेश दत्ताराम पवार करुळ यांच्या घराची संरक्षण भिंत कोसळून २० हजार रुपयांचे नुकसान, सिताराम गोपाळ कांबळे नाधवडे यांचा गोठा कोसळून २५ हजार रुपयांचे नुकसान, अमोल शिवाजी इंदप शेत घराचे १२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
तर सोनाळी येथील वसंत कृष्णा सावंत सोनाळी हे आपल्या म्हैशी चारण्यासाठी घेऊन जात होते. चव्हाणवाडी येथील काॕजवे जवळ नदीपाञात म्हैस वाहुन गेली. काही अंतरावर ही म्हैस मृतावस्थेत सापडली. मृत म्हैशीचा पंचनामा तलाठी शिंदे व पशु वैदयकीय अधिकारी विजय कर्पे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. यामुळे या शेतकऱ्याचे सुमारे ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.