साटर्डे क्लब कडून वर्धापन दिनानिमित्त सामाजिक उपक्रम

शनिवारी दुपारी 3 वाजता साजरा होणार वर्धापन दिन

मराठी उद्योजकीय चळवळ जागवण्यासाठी कटिबद्ध असलेली सामाजिक संस्था, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या रत्नागिरी चाप्टरने, पावस येथील अनसुया आनंदी महिला वृद्धाश्रम तसेच रत्नागिरीतील दिव्यांगाच्या आशादीप संस्थेला पाण्याच्या टाक्या भेट देण्यात दिल्या.

 

मराठी उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी सॅटर्डे क्लब ही संस्था गेली 23 वर्ष कार्यरत आहे. त्यापैकी आपल्या रत्नागिरी चॅप्टर ची सुरुवात 8जुलै 2018 रोजी झाली. तत्पूर्वी त्याच्या आदल्याच दिवशी म्हणजे सात जुलै 2018 रोजी क्लबचे संस्थापक इंजिनीयर श्री माधवराव भिडे यांचे देहावसन झालं हा दिवस सॅटर्डे क्लब मध्ये कृतज्ञता दिवस म्हणून पाळला जातो.

 

तर 7 जुलै हा कृतज्ञता दिवस आणि 8जुलै चा रत्नागिरी चॅप्टर चा पाचवा वर्धापन दिन या दोन्हींच्या औचित्याने सामाजिक बांधिलकी जपत, सॅटर्डे क्लब रत्नागिरी चॅप्टर च्या सर्व सदस्यांनी वर्गणी काढून टाक्यांची खरेदी केली. या दोन्ही संस्थांना पाणी साठवण्यासाठी टाक्यांची आवश्यकता होती ती पूर्ण करण्यासाठी या संस्थांना 2000 लिटरची, उत्कृष्ट दर्जा असलेली, प्रत्येकी एक टाकी देण्यात आली.

 

पावस येथील अनुसूया आनंदी वृद्धाश्रमात, 11 वृध्द महिला असून त्यांच्यासह विश्वस्त सौ चेतना खातू यांच्या उपस्थितीत टाकी प्रदान करण्यात आली. त्याचबरोबर इथे सेवा देणाऱ्या कर्मचारी मदतनीस प्रीती शिंदे. सौ नयना शेडगे. सौ सुरेखा नैकर ,सौ दीपा चव्हाण यांना प्रेमपूर्वक साडीची भेट देऊन गौरवण्यात आलं. वृद्धाश्रमामध्ये संपूर्ण वेळ जातीने लक्ष घालून व्यवस्थापन करणाऱ्या व्यवस्थापिका सौ अरुणा कदम या सुद्धा यावेळेस उपस्थित होत्या त्यांच्या सेवेच्या या कार्यासाठी त्यांना देखील गौरवण्यात आलं.

 

वय वर्ष 60 आणि त्यावरील वयाच्या वयोवृद्ध आजी या वृद्धाश्रमात वास्तव्यास असतात. वयोमानानुसार त्यांच्यावर उपचार करण्यासाठी दर महा काही खर्च येत असतो. ह्या खर्चा मधील वाटा उचलण्यासाठी इच्छुक देणगीदारांनी पुढे यावं , अशी इच्छा याप्रसंगी इथल्या व्यवस्थापिकांनी व्यक्त केली.

यानंतर संध्याकाळी रत्नागिरीच्या एमआयडीसी मधील आशादीप संस्थेत 2000 लिटर ची पाण्याची टाकी संस्थेचे संचालक श्री दिलीप रेडकर सर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली यावेळी संस्थेचे चंद्रमोहन देसाई, संजय वैशंपायन उपस्थित होते. तसेच सॅटर्डे क्लब तर्फे ,रत्नागिरी चॅप्टरचे चेअरपर्सन प्रतिक कळंबटे, सेक्रेटरी प्रकाश भुरवणे ,ट्रेझरर सागर वायंगणकर, डेप्युटी रिजन हेड तुषार आग्रे (कोंकण), डॉक्टर आशुतोष गुर्जर, मानसी महागावकर ,आर्किटेक्ट मकरंद केसरकर, पत्रकार प्रमोद कोनकर ,श्रीमती श्रमता नलावडे, सौ भक्ति गायकवाड, श्री प्रथमेश गायकवाड, श्री हिरकांत साळवी आदी सदस्य उद्योजक उपस्थित होते.

 

दरम्यान सॅटर्डे क्लबच्या रत्नागिरी चॅप्टरचा, पाचवा वर्धापनदिन शनिवारी दिनांक 8 जुलै रोजी रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील विवा एक्झिक्यूटिव्ह येथे दुपारी 3:00 वाजता साजरा

करण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता सुरू होणाऱ्या या मीटिंगकरिता मराठी उद्योजकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन क्लब तर्फे करण्यात आले आहे. या मिटींगला उपस्थित राहण्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक असून त्याकरिता अध्यक्ष प्रतिक कळंबटे

9665299329 / 9130630260 तसेच सचिव प्रकाश भुरवणे 8275919821 यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आल आहे.