लोकमान्य वाचनालय लांजाच्या वतीने रविवारी ९ जुलै रोजी जीवन चरित्र ,कथा अभिवाचनाचा कार्यक्रम

लांजा (प्रतिनिधी) लोकमान्य वाचनालय लांजा या संस्थेच्या वतीने रविवार दिनांक ९ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता साहित्यिक, लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या जीवन चरित्र ,कथा अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

लेखक जी.ए. कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या जीवन चरित्र कथा अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून याला वाचक प्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष ॲड.अभिजीत जेधे, उपाध्यक्ष योगेश वाघदरे, कार्यवाह उमेश केसरकर यांनी केले आहे . लोकमान्य वाचनालय लांजा या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडणार आहे.