शासन आपल्या दारी योजनेअंर्तगत कादवण येथे दाखले वितरण शिबीराचे आयोजन  

 

मंडणगड l प्रतिनिधी : शासन आपल्या दारी या उपक्रमाअंर्तगत मंडणगड तहसिल कार्यालयाचे लाटवण महसूल मंडळाचेवतीने तहसिलदार तानाजी शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली 7 जुलै 2023 रोजी कादवण समाजमंदिरात दाखल वितरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील नागरीकांनी मागणी केलेली नवे प्रस्तावही स्विकारण्यात आले. या कार्यक्रमास तहसिलदार तानाजी शेजाळ, अव्वल कारकून श्री. बिच्चेवार, मंडळ अधिकारी निलेश गोडगासे, प्रकाश साळवी, एस.के.गुरव, तलाठी श्री.सय्यद, श्रीमती मुल्ला, श्रीमती ठोंबर अव्वल कारकून मुयर पोळ, सेतु कर्मचारी किरण चव्हाण, निवडणुक कर्मचारी कुणाल नाकती, बॉड रायटर सिराज गमरे, आधार केंद्र चालक श्री. सापटे, श्रीमती महाडीक, ग्रामसेवक अक्षय खोपडे, श्री. काळे, राजकीय कार्यकर्ते राजेंद्र सोंडकर, दीपक मालुसरे, सामाजीक कार्यकर्ते विजय खैरे, सरपंच उपसरपंच पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महसुल मंडळाचे कार्यक्षेत्रातील 31 नागरीकांना उत्पनांचे दाखलल्याचे वितरण करण्यात आले. 17 जातीचे दाखल्याची वितरण करण्यात आले. 12 आधार कार्डांची दुरुस्ती करण्यात आली. शासनाच्या विविध लाभाच्या आर्थीक सहाय्य योजनांची 21 प्रकरणे मंजुर करण्यात आली. पी.एम. किसान योजनेची 4 प्रकरणाची नोंदणी कऱण्यात आली. उत्पनाचे दाखल्याचे मागणी नवीन 28 प्रस्ताव यावेळी स्विकारण्यात आले याशिवाय ओबीसी जातीचा दाखला मागणीचे 2 नवीन प्रस्ताव स्विकारण्यात आले. रेशनकार्डावर नावे वाढविण्याचे 2 नवीन प्रस्ताव याचबरोबर रेशन कार्डाचे नव्याने मागणीचा 1 नवीन प्रस्ताव यावेळी स्विकारण्यात आला. नवे मागणी आर्जाची सर्व प्रशासकीय प्रक्रीया पुर्ण करुन दाखले लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याचे यावेळी सांगण्यात आले.

फोटो ओळी- मंडणगड तहसिल कार्यालयाने कादवण येथे आयोजीत केलेल्या कार्यक्रमात लाभार्थीस दाखल्यांचे वितरण करताना तहसिलदार तानाजी शेजाळ कार्यक्रमास उपस्थित मान्यवर व कर्मचाऱ्यांसमवेत दिसत आहेत.