लांजा हायस्कूलचे क्रीडाशिक्षक रवींद्र वासुरकर यांना भारत क्रीडाभूषण सन्मान २०२३ पुरस्कार जाहीर

नेहरू युवा केंद्र पणजी, गोवा आणि किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र सिंधुदुर्ग यांचा पुरस्कार

लांजा (प्रतिनिधी) न्यू इंग्लिश स्कूल लांजाचे क्रीडा शिक्षक रवींद्र चंद्रकांत वासुरकर यांना नेहरू युवा केंद्र पणजी, गोवा आणि किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा सामाजिक कला संमेलन २०२३ अंतर्गत भारत क्रीडा भूषण पुरस्कार भूषण सन्मान हा पुरस्कार जाहीर झाला आहे. रविवारी ९ जुलै रोजी पणजी येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

लांजा हायस्कूलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असलेले रवींद्र वासुरकर यांनी यांना आजवर शेकडो संस्थांचे पुरस्कार मिळालेले आहेत. क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय आशा योगदानाबद्दल त्यांना नेहरू युवा केंद्र पणजी आणि किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संशोधन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या वतीने दिला जाणारा मानाचा भारत क्रीडा भूषण सन्मान २०२३ पुरस्कार जाहीर झाला आहे. रविवारी ९ जुलै रोजी पणजी येथील कला व संस्कृती संचालनालय भवन सभागृह पाटो या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात रवींद्र वासुरकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन गोवा सरकारचे मजूर व पुनर्भिलेख मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार चंद्रकांत शेट्ये तसेच प्रमुख अतिथी म्हणून खासदार विनय तेंडुलकर, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, माजी उपमुख्यमंत्री दयानंद नार्वेकर तसेच कला व संस्कृती संचालनालयाचे सगुण वेळीप, तसेच का उपसंचालक कालिदास घाटवळ, माजी संचालक हि..एम. प्रभूदेसाई हे उपस्थित राहणार आहेत.

या पुरस्काराबद्दल रवींद्र वासुरकर यांचे तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे.