सचिवपदी उमेश शिरोडकर, खजिनदारपदी सचिन शारबिद्रे ; नूतन संचालक मंडळाचा उद्या पदग्रहण सोहळा
मालवण | प्रतिनिधी : लायन्स क्लब ऑफ मालवणच्या अध्यक्षपदी विश्वास गावकर यांची निवड करण्यात आली आहे. विश्वास गावकर हे यापूर्वीही लायन्स क्लब मालवणचे अध्यक्षपद भूषवले असून त्यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपदाचा सन्मान प्राप्त झाला आहे.
नूतन कार्यकारिणीच्या सचिवपदी उमेश शिरोडकर तर खजिनदारपदी सचिन शारबिद्रे यांची निवड झाली आहे. कार्यकारी मंडळाचा शपथविधी व पदग्रहण सोहळा रविवारी ९ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता रिजनल चेअरमन एमजेएफ राजेंद्र शहा कांसवा यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील दैवज्ञ भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.
लायन्स क्लब मालवणचे नूतन संचालक मंडळ : अध्यक्ष विश्वास गावकर, माजी अध्यक्षा वैशाली शंकरदास, सचिव- उमेश शिरोडकर, खजिनदार – सचिन शारबिद्रे, प्रथम उपाध्यक्ष- अनुष्का चव्हाण, द्वितीय उपाध्यक्षा अंजली आचरेकर, तृतीय उपाध्यक्ष सहदेव बापर्डेकर, सहसचिव- स्नेहा जामसंडेकर, सहखजिनदार – मीना घुर्ये, टेल ट्रिस्टर पल्लवी खानोलकर, टेमर- स्वप्नाली नेरुरकर, स्वच्छ भारत-श्वेता यादव, लायन क्रेस्ट- जयश्री हडकर, मेंबरशिप चेअरमन- राधिका मोंडकर, पीआरओ-दिक्षा गावकर, जीएसटी चेअरमन राजा शंकरदास. तरी या पदग्रहण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन मावळत्या अध्यक्षा वैशाली शंकरदास, खजिनदार अंजली आचरेकर, सचिव अनुष्का चव्हाण यांनी केले आहे.
फोटो : अध्यक्ष – विश्वास गावकर
फोटो : सचिव – उमेश शिरोडकर
फोटो : खजिनदार – सचिन शारबीद्रे