तळेरे-वैभववाडी रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा
सरपंच व रिक्षाचालकांची तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
वैभववाडी प्रतिनिधी : तळेरे – वैभववाडी या महामार्गाची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता तात्काळ डागडुजी करून सुस्थितीत करावा अशी मागणी या मार्गानजीकच्या गावातील सरपंच व रिक्षाचालकांनी वैभववाडी तहसीलदार दिप्ती देसाई यांच्याकडे केली आहे.
तळेरे – वैभववाडी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. संपुर्ण मार्ग खड्डेमय बनला आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. संबधित विभागाला सुचना देऊन येत्या पंधरा दिवसांत मार्ग सुरळीत करावा. अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी उपस्थितांच तहसीलदार दिप्ती देसाई यांनी म्हणणं ऐकून घेतले. यासंदर्भात संबंधित विभागाला सुचना दिल्या जातील असं आश्वासन त्यांनी दिले. यावेळी नापणे सरपंच प्रदीप जैतापकर, नाधवडे शैलजा सुतार, कोकीसरे अवधूत नारकर, सज्जन माईणकर, रिक्षा संघटना जिल्हा उपाध्यक्ष सचिन तळेकर, नापणे उपसरपंच जयप्रकाश यादव, प्रकाश बोडेकर, प्रदीप नारकर, दाजी पाटणकर, अनिल नारकर, रमेश नारकर, प्रकाश जंगम, बाळकृष्ण कपाळे,श्रीरंग पावसकर, सुनील कोकरे, रमेश कोकरे यासह ग्रामस्थ व रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.