दि .6 जुलै 2023 रोजी लाल बहादूर शास्त्री हायस्कूल दहागाव येथे शिक्षक पालक संघाची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. सभेला शालेय समितीचे अध्यक्ष श्री. मदनभाई दळवी, गावचे सरपंच श्री.मंगेश दळवी,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री.लोखंडे साहेब ,शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या श्रीमती गांधी मॅडम , प्रशालेचे मुख्याध्यापक श्री हुलगे सर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी पुष्प देऊन केले. सभेचे प्रास्ताविक प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री.जाधव पी. बी. यांनी केले. सभेच्या सुरुवातीला प्रशालेच्या इ 9 वी मधील अंध विद्यार्थिनींनी सुमधुर आवाजात स्वागत गीत व इशस्तवन सादर करून पालकांचे स्वागत केले. मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन प्रशालेचे शिक्षक श्री. इंगळे आर.व्ही.यांनी केले. त्या नंतर इ.10 वी परीक्षेतील, तसेच स्कॉलरशिप परीक्षा, NMMS परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
त्या नंतर प्रशालेतील शिक्षक श्री. शेले सर यांनी शैक्षणिक गुणवत्ता व शालेय शिस्त या बाबत मार्गदर्शन केले. श्री. माने सर यांनी क्रीडा स्पर्धा व बाह्य परीक्षा या संदर्भात मार्गदर्शन केले. विविध मान्यवरांनी आपल्या भाषणातून शाळेच्या प्रगती बाबत समाधान व्यक्त केले व शाळेच्या प्रगती साठी सहकार्य करण्याचे पालकांना आवाहन केले. सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली..अध्यक्षीय भाषणात प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. हुलगे सर यांनी शाळेत राबविले जाणारे विविध उपक्रम ,शालेय शिस्त , पालकांची जबाबदारी या विषयी मार्गदर्शन केले..
अशा प्रकारे मंगलमय वातावरणात शिक्षक पालक संघाची सर्वसाधारण सभा पार पडली.या सभेला सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते…